न्यायालयाच्या आदेशाने चोरीची रक्कम परत…

पातूर – निशांत गवई

वाशिम-अकोला रोडवर जुने बस स्टँडवर उभ्या असलेल्या ट्रकचे टायर स्टेपनी मागील वर्षी 2020 रोजी चोरी गेल्याची घटना घडली असता घटनेची फिर्याद पातूर पोलीस स्टेशनला दाखल झाली असता पातूर पोलिसांनी अप.क्र.189/20 भादंवि 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे प्रकरण पातूर दिवाणी कोर्टात न्यायप्रविष्ट होते. दरम्यान आज दि. 3/12/2021 रोजी पातूर न्यायालयाचा आदेश एमसीसी क्र.53/21 नुसार फिर्यादी शेख मुख्तार शेख गफूर रा.मुजावर पुरा,पातूर यांना पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांनी 25000 रुपये नगद रक्कम पंचासमक्ष सुपूर्द केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here