‘कोर्ट’ चित्रपटाचे अभिनेते वीरा साथीदार यांचे कोरोनाने दु:खद निधन…

न्यूज डेस्क – नागपुरातील कोरोनाचे वाढते संक्रमण ही चिंताजनक बाब होत असून यातच नागपुरातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारे,आंबडेकरी चळवळीतील गीतकार,पत्रकार व विचारवंत ‘वीरा साथीदार’ यांचे आज कोरोनामुळे निधन झाल्याचे वृत्त धक्कादायक आहे.

रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.नागपुरात राहून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनयाची छाप पाडणाऱ्या या महान कलावंताच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्र,साहित्य चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here