नगराध्यक्ष दिलीप देशमुख व प्रभारी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्यासमोर विविध मागण्या विषयावर चर्चा करतानि नगरसेवक दामोदर धोपटे…

रामटेक – राजू कापसे

नळ जोळणीची अन्यायकारक वसुली थांबवा;रामटेक कराची माग मागण्या पूर्ण न झाल्यास नगर परिषदे समोर आंदोलन; नगरसेवक, दामोदर धोपटे रामटेक महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्यान महाभियानाअंतर्गत, रामटेक वाढिव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रामटेक शहरात वाढीव पुरवठा योजना कार्यन्वित केली आहे.

शहरामध्ये वितरण करणाऱ्या पाईप लाईन मधून नळ कनेक्षण जोडणी करण्या करीता , नागरीकां कडून अन्यायकारक वसूली करण्यासंदर्भातील निर्णय तातडिने रद्द करावी अशी मागणी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

नगर परिषदेचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख व प्रभारी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या उपस्थित नगरसेवक दामोधर धोपटे यांच्या नेतृत्वात शिष्यमंडल यांनी विविध विषयावर चर्चा केली.यावेळी विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्याबाबत निवेदनही देण्यात आले.यामध्ये विषय यात्रा स्थळ निधी अंतर्गत श्रीराम गड मंदिर येथिल पाणीपुरवठा योजनेचे रडखडलेले काम तातडिने पुर्ण करूण, योजना कार्यान्वीत करणे.

टिळक वार्ड येथिल कृत्रीम पाणी समस्या तातडिने सोडविणे विवेकानंद वार्ड (ठाकूर नगर) येथिल जलनिस्सारणाची समस्या तातडिने सोडविणे विनोबा भावे वार्ड येथिल कृत्रीम पाणी समस्या तातडिने सोडविण अनुसूचित जमातीच्या ( S T ) कुटूंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेची तातडिने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोणातून कार्यवाही करणे.

निवेदन देतांना व चर्चा करतांना भाऊराव जी रहाटे गुरुजी, माजी नगराध्यक्ष सौ शोभाताई राऊत, माजी नगराध्यक्ष सौ माधुरी ताई उईके, सौ लिनाताई मानकर, सौ आम्रपालीताई भिवगडे, बबलू दुधबर्वे, राहूल कोठेकार, आरिफ मालाधारी, माजी नगरसेवक धनराज मानकर, सुशांत राळे, रूपेश जांबूलवार,

कैलास बागडे, वाहाब शेख, आकाश वाघधरे, भूषण दमाहे, अनुप सावरकर, संजय बागडे, हिमांशू चांदेकर, महेंद्रा नागपुरे, लंकेश बलगेवार, बंडू भाऊ भिवगडे यांचे साहित विविध वार्डातील महिला व पुरुष नागरीक उपास्थित होते.

मागण्या पूर्ण न झाल्यास 20 आक्टोबर ला नगरपरिसदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक दामोदर धोपटे यांनी यावेळी दिला.मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून सोडविण्याचे आश्वासन नगराध्यक्ष दिलीप देशमुख व प्रभारी मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here