विवरा येथील घरकुलाच्या यादीत भ्रष्टाचार…आमरण उपोषणाचा इशारा…

फोटो -सौजन्य गुगल

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील ग्राम विवरा येथील रहिवासी असलेले सहदेव वासुदेव पजई यांनी पालकमंत्र्यांना एक निवेदन सादर करून घरकुलांच्या यादीत हेराफेरी व भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई झाली नाही तर पंचायत समिती समोर आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी निवेदनात दिला.

सहदेव पजई यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की चार वर्षांपूर्वी घरकुलांची यादी तत्कालीन ग्रामसेवकांनी गावात सर्वे करून तयार केली होती. ही यादी नमुना ड नुसार तयार करण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या ग्रामसेवकांनी ऑनलाइन पद्धतीने सर्वे करून घरकुलांची यादी तयार केली. मात्र नव्याने तयार करण्यात आलेली ही यादी नमुना ड नुसार करण्यात आलेल्या यादी प्रमाणे नव्हती. त्यानंतर अपंगांच्या नावाने यादीमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला.

यादीतील नावे हेराफेरी करून खालीवर करण्यात आली. या सगळ्या प्रकरणात भ्रष्टाचार करून काही लोकांना लाभ मिळवून देण्यात आला. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी. अशी मागणी सहदेव परब यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली असून दोषींवर कारवाई झाली नाही तर पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असल्याचे किंवा सनदशीर मार्गाने न्याय मागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here