देऊळगाव ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचारावर पडदा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ;सचिवाने दीड वर्षापासून संपूर्ण प्रभार हस्तांतरित केलाच नाही…

या प्रकरणात जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी तर अधिकारी कर्मचाऱ्याला पाठीशी घातले नसेल ना असा सवाल नागरिकांमध्ये होत आहे.

पातुर – निशांत गवई

मौजे देऊळगाव तालुका पातुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या तार कंपाउंड बाबत तक्रार करण्यात आली होती तक्रारदार गोपाल बदरखे यांनी यांच्या तक्रारीनुसार कनिष्ठ अभियंता व विस्तार अधिकारी पंचायत समिती पातुर यांना चौकशी करणे बाबत सूचित करण्यात आले होते.

त्यानुसार मौजे देऊळगाव येथे कनिष्ठ अभियंता व विस्तार अधिकारी पंचायत समिती पातुर यांनी तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड कामाची पाहणी केली असता काम अपूर्ण स्थितीत असून सदर कामाचे अंदाजपत्रक मोजमाप पुस्तिका तथा संबंधित रेकॉर्ड सचिव ग्रामपंचायत देऊळगाव यांच्याकडून तपासणीस उपलब्ध झाले नाही,

त्यामुळे देऊळगाव ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे तसेच याप्रकरणी ग्रामपंचायत देऊळगाव चे सचिव पांडुरग वाघ यांना गटविकास अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून ग्रामपंचायत देऊळगाव चा परिपूर्ण प्रभार अद्याप पर्यंत का हस्तांतरित केला नाही,

तसेच सदर काम आपण अपूर्ण स्थितीत का ठेवले याबाबत खुलासा तीन दिवसाच्या आत कार्यालयात सादर करण्याचे म्हटले असतानासुद्धा सदर कारणे दाखवा नोटीस सचिव पांडुरंग वाघ यांनी दाखवली केराची टोकरी दाखवली असून त्यामुळे गट विकास अधिकारी यांनी पुन्हा सचिव पांडुरंग वाघ यांना यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून याप्रकरणी सचिन वाघ काय उत्तर देतात याकडे देऊळगाव ग्रामपंचायत वासियांचे लक्ष लागलेले आहे.

विहित मुदतीत प्रभारी यादी खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील होणाऱ्या प्रशासकीय कारवाई वैयक्तिक जबाबदार राहाल असे कारणे दाखवा नोटीस मध्ये नमूद आहे ग्रामपंचायत देऊळगाव मध्ये पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला असून गेल्या दोन वर्षापासून तक्रार देऊनही अद्यापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आले नसल्याने अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे याप्रकरणी भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे

देऊळगाव ग्रामपंचायत सचिव पांडुरंग वाघ यांनी त्यांचा संपूर्ण पदभार हस्तांतरित केला नसून त्यांनी केलेले काम अपूर्ण स्थितीत असल्याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे पंचायत समिती पातुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here