अकोला प्रादेशिक वनविभागाच्या आलेगाव परीक्षेत्राने ओलांडल्या भ्रष्ट व बेबंदशाहीच्या परिसीमा…

पातूर – निशांत गवई

एका प्रकरणाची शाई वाळते न वाळते तो दुसरे तयार. एका महिन्यात चवथ्यांदा घडलेले अवैध करनाम्यांनी वनविभागाचे वाभाडे काढले असून वनाधिकाऱ्यांच्या हेतु व कार्यक्षमते बाबत अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत.

१) नवेगाव (आलेगाव)- अतिक्रमण धारक बनावट कागदपत्रांनी राखीव वनक्षेत्रात किमती सागवान झाडे स्वताची म्हणून तोडतात,ट्राझीट परवाने शिक्यात खोडाखाड,वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व चिथावणीने शासकीय वनमोजणीत अडथळे आणून पंचावर जिवघेणा हल्ला.

२) पाडशिंगी (आलेगाव)- अधिकाऱ्यांना पार्टीत गुंगवून राखीव वनातील सागवानी झाडे अवैधरित्या राजरोसपणे तोडून तस्करी.
३)सावरगाव (आलेगाव)- महावितरणच्या पोलवरुन आकोडे टाकून अवैध वीजचोरी,पाणीचोरी करुन रोपवनाला पाणी देत नीधी हडपणे.

ही गैरकृत्ये संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतांना आलेगाव परिसरातील जनसामान्यांनी अनेक प्रत्यक्षदर्शी चित्रे, व्हिडीओ शुटींग जिवंत प्रक्षेपणा द्वारे वनविभाग फायरलाईन या गोंडस नावाने शासन व जनतेला उल्लु बनवून कशाप्रकारे शासकीय निधी हडपत आहेत याची विभागाला रितसर तक्रार केली आहे.आलेगाव परिक्षेत्रात वनविभागाचे हजारो हेक्टर राखीव वनखंडे असून अनेक गावांना जोडणारी पक्के, कच्चे रोड यातून जात आहेत.

पाडशिंगी या ग्रामपंचायत अंतर्गत भुमी अभिलेख नोंदीनुसार “A Class Forest” म्हणून खाते क्रमांक १०६ वर ८९३.३२ हेक्टर राखीव वन आहे. या राखीव वनाच्या कुपा मध्ये 2018-19 च्या 33 कोटी व्रुक्षलागवडीच्या भरिव वन (MAP) योजनेत रोपवन तयार करण्यात आले. वनविभागाच्या मंजूर आराखड्या व नियमानुसार पावसाळ्यात वाढलेल्या तन, गवत, गाजरगवत यांची साफसफाई करण्याची कामे केली जातात.

वनातून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढणारी बांडगूळे प्रती बाजुने १२ मिटर रूंद, कुपामध्ये ५ मिटर व रोपवनात ३ मिटर रुद अशा पट्ट्यातीत गवत व तनकाड्या व निकामी वनस्पती मजुरांद्वारे कूदळ फावड्याने काढून एका जागी जमा करुन वाळवली जातात व अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली दक्षता बाळगून जाळली जातात.

१२ मिटर रुंदीच्या साफसफाईचा मंजूर दर हा एका कि.मि. रोडसाठी ७.४७ मजुर दिवसx ३९९ रोज याप्रमाणे जवळपास ३००८रु. एवढी निधी मंजुरीने ही रक्कम लाखो मध्ये पोहचते. कूप व रोपवनासाठी या प्रमाणे वेगवेगळी मापदंड आहेत. प्रत्यक्षात मंजूर शासन निर्देशाचे नियम पायदळी तुडवत रूढ रूंदीला तिलांजली देत कोणीही मजूर न लावता रखवालदारा कडून जंगल पेटवून जाळपोळ करण्यात आली.

या बेछूट जाळपोळीने व जाळाच्या थैमानाने लांबी, रुंदीच्या ठराविक मर्यादा तोडत भरीव वन योजनेत लाखो रु,खर्चिक निधीची ३वर्षीय रोपे व मोठमोठी झाडे सुद्धा करपून नष्ट केल्या गेली हे या सोबत प्रसारित ताज्या पुराव्यानिशी सिद्ध होते.स्वतःच्या स्वार्थी आर्थिक लाभापोटि ईतक्या खालच्या दर्जावर येणाऱ्या अधिकारी,कर्मचारी व त्यांच्यावर कारवाई करण्या ऐवजी त्यांची आवश्यकता नसताना पाठराखण करणाऱ्या उप वनसंरक्षकांनी सारासार विचाराने आपली सौम्य भुमिका बदलून दोषींवर कारवाई करुन जरब बसवावी ही अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here