नगरसेवक विष्णू माने यांनी प्रभागातील स्ट्रीट लाईटसाठी दिले एका महिन्याचे मानधन.

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकाक्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय नगरसेवक विष्णू माने यांनी पुन्हा एकदा आपले एक महिन्याचे मानधन सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी देऊन आपला नागरिकांच्या प्रति असलेला जिव्हाळा व्यक्त केला आहे.

दरम्यान प्रभाग क्रमांक आठमधील स्ट्रीटलाईट काही ठिकाणी बंद असल्याने इथल्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.शिवाय खांबावरील यंत्रणा नादुरुस्त झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांनी आपले एक महिन्याचे मानधन खर्च केले आहे.यामध्ये ट्यूब,चोक,स्टार्टर इत्यादी लाईटच्या साहित्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here