कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या आंबेठाणमध्ये कोरोनाची तपासणी शिबीर…

राजगुरूनगर ( पुणे ) : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या आंबेठाण येथील वाड्यावस्त्यांवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत गावातील नागरिकांचे घरटी सर्वेक्षण तपासणी ४९ पथकांच्या मदतीने करण्यात आली यामध्ये १३०७ कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात आली.

करंजविहिरे आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री महाजन, डॉ.निलेश मोहिते,शाम बहाकर,गौरी गावडे,प्रकाश खांडके,आरोग्य सेवक अनिल बोंडे,राजश्री भालेराव,नाइकरे,रेखा दवणे,मनीषा ओव्हाळ यांनी काम पाहिले.तर ग्रामविकास अधिकारी आर.आर.उगले,सरपंच संघमित्रा नाईकनवरे,दत्तात्रय मांडेकर,शांताराम चव्हाण तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योग्य व्यवस्था केली होती.

गावठाणासह वाड्यावस्त्यांवर ४९ आरोग्य तपासणी पथकांद्वारे घरटी नागरिकांची ऑक्सिजन पातळी,तापमान तसेच ज्यांना कोरोना सदृश लक्षणे असणाऱ्या लोकांची येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे.

आज तपासणी करण्यात आलेल्या १३०७ कुटुंबातील लोकांची तपासण्या करण्यात आल्या त्यातील ५१ जण संशयित आढळून आले त्यांची रॅपिड अँटिनन टेस्ट केल्यावर त्यातील ६ लोकांना कोरोनाचे लक्षणे आढळून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोविड सेंटरला पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here