नागपूरात कोरोनाचा कहर…नविन २८ रूग्णांची भर…कोरोनाबाधितांची संख्या १४५१ वर…

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर – नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.रविवारी दिवसभरात २८ नविन कोरोनाबाधि रुग्णांची भर पडली आहे.आता नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४५१ झाली आहे.

राजस्थान येथील एक तरूणाचा मूत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.हा तरूण राजस्थान येथील बिकरी येथील रहिवासी असून त्याचा खिशातून रेल्वेचे तिकीट मिळाले आहे.

यामुळे कोरोना बळीचा आकडा २४ वर गेला आहे.आंनददायक बाब म्हणजे तब्बल ११६० जन कोरोनावर मात करून मुक्तही झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here