कोरोना योद्ध्यांना पावसाच्या पाण्यातच बजावत लागत आहे कर्तव्य…

प्रतिनिधी-राहुल मेस्त्री
गेले दोन दिवसा पासून कोगनोळी तालुका .निपाणी ,जिल्हा .बेळगाव व परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी घेतली आहे .दोन दिवस झाले या ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी पडत आहे .

मात्र कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोगनोळी सीमा नाक्यावरती आपले कर्तव्य बजावत असलेल्या कोरोना योध्ये आरोग्य अधिकारी ,परिचारिका व आशा कार्यकर्त्या यांना पावसाच्या पाण्यातच काम करावे लागत आहे.

याठिकाणी पाऊस पडत असल्याने पत्र्याचे शेड केले असले तरी सततच्या पावसामुळे या शेडमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील कर्मचारी व प्रवासी यांना या पाण्यातूनच ये जा करावे लागत आहे.

पावसाळा सुरू झाल्याने याठिकाणी येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन प्रशासनाने करणे गरजेचे आहे .मात्र या ठिकाणी पाण्याचे कोणतेही व्यवस्थापन केले नाही असे दिसते आहे. या पावसाच्या पाण्यात काम करत असणारे आरोग्य अधिकारी, परिचारिका ,अशा कार्यकर्त्या व महसूल अधिकारी यांच्याजवळ

अनेक प्रवासी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्याच्या रेड झोन भागा मधून आलेले असतात. त्यामुळे याठिकाणी या पाण्यामुळे कोणताही दुष्परिणाम होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here