कोरोना व्हायरस जनजागृती पथनाट्य…

रामटेक – राजु कापसे

मनसर संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे त्रस्त झाले आहे,तपासणी करण्याकरिता सगळे घाबरत आहे.याच पाश्र्वभूमीवर आयुष्यमान हॉस्पिटल, कामठी आज रामटेक तालुक्यातील समस्त गावात पोहचून पथनाट्य सादर करून जनतेत जण जागृती करत आहे.

त्यामुळे कोरोना संबधी सविस्तर माहिती प्राप्त होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.तालुक्यात पथनाट्यातू जागृकता निर्माण करीत आहे.  या कार्यकरम्यान दरम्यान मनसर येथे रामटेक ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी म्हटले कि आज जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे आज त्याची खरच गरज आहे,

आम्ही पण लोकांना सोशल डिस्टीनसिन्ग च पालन करा,नियमित हात धुवा,मास्क वापरा, असे सांगत असतो.आज आपण याच पालन करू तर आपलं परिवार चांगलं राहील ,आपण सुरुशित तर घर सुरुशित अशी आम्ही लोकांना वारंवार सूचना देत असतो.

गावातील मुख्य रस्त्यावर पथनाट्य सादर करण्यात येत आहे,त्यातून गावकर्यांना भीतीशी लढण्याची प्रेरणा मिळते.पथनाट्य दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी सगळ्यांना शपथ पण देण्यात आली.

यावेळी आयुष्यमान हॉस्पिटल,कामठी तर्फे डाँ त्रिदिन गुहा,डाँ शर्मा सर ,अजय किरपान,बेंजु खरे,जितु वलोकर,विक्रम फर्डक,दीपक तिघरे,वैभव कोलते,स्नेहा तिडके,दामिनी सेलोकर,सय्यद अरब्रर आदी कार्यकर्ते सहभागी होऊन या सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here