मनसर येथे तहसीलदारांनी राबविली कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम…

रामटेक – राजु कापसे

ग्राम पंचायत मनसर येथे आज दिनांक 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 पर्यंत मा. श्री. बाळासाहेब मस्के तहसीलदार रामटेक यांनी स्वतः उपस्थित राहून मनसर येथील वार्ड क्रमांक 2 मधील भागात घरोघरी जाऊन कोरोना विषयक लसीकरणाबाबत आढावा घेतला व ज्या घरातील 45 वर्षावरील नागरिकांनी लस घेतली नसेल त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे जाऊन तात्काळ लस घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

सदर धडक मोहिमे दरम्यान ज्यांच्या कडे मास्क नव्हते त्यांना मास्क देऊन नियमितपणे मास्क वापरण्याच्या सूचना दिल्यात.ग्राम पंचायत मनसर तर्फे सौ.योगेश्वरी हेमराज चोखांद्रे सरपंच ग्राम पंचायत मनसर यांनी गावातील 45 वर्षावरील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून स्वतःच्या आवाजातील ऑडिओ क्लिप तयार करून मोहिमेत साउंड स्पिकर वर वाजवून गावातील जनतेला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी निवेदन केले.

सदर निवेदनात त्यांनी स्वतः लसीकरण केलेलं असून लसीकरण फार सुरक्षित आहे, लसीकरणामुळे आपण आपला जीव कोरोना महामारीपासून वाचवू शकतो, त्यामुळे कोणीही सांगितलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आपण तात्काळ लसीकरण करून घ्यावा असे सांगितले.

त्यावेळी रामटेकचे पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद मकेश्वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे,मनसर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोरकर, प्रा. हेमराज चोखांद्रे माजी सदस्य ग्राम पंचायत मनसर,ग्राम पंचायत सदस्य नंदकिशोर चंदनखेडे,कंचन धनोरे, ग्राम विकास अधिकारी जीवनलाल देशमुख,

ग्राम पंचायत कर्मचारी विलास मडावी, पोलीस पाटील विमलेश बिहाळे व ईतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम दररोज राबविण्यात यावी, अश्या सूचना तहसीलदार !मा.श्री.बाळासाहेब मस्के यांनी ग्राम विकास अधिकारी जीवनलाल देशमुख यांना दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here