बुलढाणा डोंगरशेवली येथे कोरोणाच्या लसीकरणाला प्रारंभ..!

चिखली :- राहुल गवई

संपूर्ण जगभर थैमान घालणाऱ्या कोरोणा वर मात करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या covid-19 लसीचा दिनांक 6 एप्रिल 2021 पासून मौजे ग्राम डोंगरशेवली येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी गावचे सरपंच सौ. स्वाती राजेंद्र इंगळे ,उपसरपंच तथा महाव्हॉइसचे तालुका ग्रामीण प्रतिनिधी राहुल विष्णू गवई यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्रात फीत कापून लसीकरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. लसीकरणा च्या वेळी गावातील 45 ते 60 या वयोगटातील तसेच साठ वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉ. स्वाती अवचार सह आरोग्यसेविका एस. पी. गवारगूरू ,आरोग्य सेवक आर. ई. बुरकुल , आरोग्य सेविका एम.टी.कंडारे, ए आय बागवान, तलाठी आर. पी. वावगे, पोलीस पाटील एस. एन. कोल्हे, विजय उबरहंडे्सर, आशा कर्मचारी ज्योती गणेश कानफाडे, सुनिता गौतम साळवे, शारदा गजानन दसरकर सह लस घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत गावकरी मंडळी उपस्थित होते.

यावेळी तीन दिवसीय होणाऱ्या लसीकरणाचा सर्व गावकऱ्यांनी लस टोचून घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग, कोवीडमध्ये सात सहयोग देणारी सर्व शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन तथा डोंगर शेवली गावच्या विकासात वेळोवेळी मदत ,साथ सहयोग तथा मार्गदर्शन करणाऱ्या गावातील सर्व आजी-माजी गावच्या विकासात भर टाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here