Corona Update | देशात २४ तासात कोरोना रुग्णांची रेकार्ड ब्रेक वाढ…

न्यूज डेस्क – देशात गेल्या २४ तासांत २२,७७१ नवे कोरोनाबाधित रुग्णांची रेकार्ड ब्रेक वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झाली असून कोरोना या वाढत्या रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६,४८,३१५ इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६०.७२ टक्के झाले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे.

बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.५ लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ४२ हजार ५७६ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण ९५ लाख ४० हजार ७४९ चाचण्या करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here