नवरात्री उत्सवांवर कोरोनाचे सावट…

रामटेक – राजु कापसे

दिवसेंदिवस कोरोना संक्रमण वाढल्यामुळे रामटेक शहरात नवरात्री उत्सवावर कोरोनाचे सावट पसरले आले.दरवर्षी उत्साहपूर्वक साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्री उत्सवाचे भाविक भक्त,

जेष्ठ नागरिक व इतर मंडळी मोठ्या उत्साहाने या उत्सवाची वाट पाहत असतात विशेषता गरबा खेळणारे व गरबा चे आयोजन करणारे मंडळींची तर त्याची सहा महिन्यापासून तैयारी सुरू असते.

मां कलंका देवस्थान व गायत्री मंदिर येथे ३०० व ४०० सामूहिक घट बसविल्या जातात व सकाळपासून दर्शनाकरिता भाविकांची रांग लागणे सुरू असते. एकविरा देवस्थान, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या,

दगडांच्या बाहुली मध्ये असलेले मा कुमारिका देवस्थान मा बम्लेशवरी देवस्थान आदी ठिकाणी असलेली विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणावर असते परंतु कोरोणाचे संकट पाहता सगळे सगळीकडे सामसूम आहे.

देवस्थानचे मुख्य गेट बंद आहे देव सुद्धा बघ भक्ताच्या दर्शनाला आतुरलेला आहे. देवाची भेट दरवाजे बंद असल्यामुळे सहा महिन्यापासून भाविकाला दर्शन झालेले नाही. सायंकाळी गरबा खेळणाऱ्या युवक- युवतीची मोठी निराशा झाली यावर्षी गरबा नसल्यामुळे त्यांना खेळता येणार नाही उत्सवा मध्ये भाग घेता येणार नाही.

गायत्री मंदिर येथील नत्थुजी घरझाडे व शंकर चामलाटे यांनी सांगितले की मागच्या वर्षी आमच्याकडे सामूहिकरीत्या ४०० ज्योती कलश बसवले होते परंतु या वर्षी कोरोना चे संकट पाहता गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सामूहिक ज्योत कलश यावर्षी स्थापन केले नाही,

फक्त गायत्री मंदिराच्या वतीने नऊ ज्योती कलश स्थापन करण्यात आले आहेत. कोरोना संबंधी शासन,प्रशासनाचे नियम ,निर्देश पाळुनच नवरात्रोत्सव अंत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रत्येक मंडळाने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here