तेल्हारा – विकास दामोदर
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये अकोला जिल्ह्यात लॉक डाउन ची घोषणा करण्यात आली व या आदेशाची अंमलबजावणी पोलीस स्टेशन तेल्हारा तथा नगर पालिका यांच्या द्वारे काटेकोर पणे करण्यात आली.

एरव्ही तेल्हारा शहरातील गजबजलेले ठिकाणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चौक, मानकर चौक, टॉवर चौक आज निर्मनुष्य दिसून आले. ठाणेदार शेळके साहेबांच्या मार्गदशानात पि. एस. आय. निलेश देशमुख, राजूभाऊ इंगळे, सागर मोरे निकेश सोळंके, विजुभाऊ खेकडे, काळे साहेब इ. पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

बेजबादारीने वागणाऱ्या नागरिकांना पोलिसी खाकी दाखवून वठनिवर आणले. एवढेच नव्हे येथूनच नजीक असणाऱ्या घोडेगाव येथे छोटेखानी बाजार भरवणाऱ्या दुकानदारांना देखील चांगलाच चोप दिला.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक नागरिकांनी घरावाहेर पडतानी मास्कचा वापर करावा, साबणाने स्वच्छ हात धुवावे, आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे महाव्हॉइस द्वारे सर्व जनतेस आहावान करण्यात येते.