काँग्रेसच्या लॉंगमार्चमध्ये कोरोना नियम पायदळी; सत्ताधार्‍यांना कायदा नसतो का?

भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांचा सवाल.

नांदेड – महेंद्र गायकवाड

शेतकरी, कष्टकरी यांच्या नावाचा फायदा घेत अनेक वर्षे सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस पक्षाने नेहमीच या घटकांची उपेक्षा केली. देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार यांच्या हिताचा क्रांतीकारी कायदा अस्तित्वात आला पण मोजी भाजपाचे द्वेषाने पछाडलेल्या काँग्रेस पक्षाचा नांदेड मध्ये जो शेतकरी लॉंग मार्च निघाला त्यात शेतकरी कमी आणि उद्योजक-व्यापारीच अधिक होते.

कोरोना नियमाला पायदळी तुटडवित राज्यातील सत्ताधार्‍यांनी मोर्चात नियमभंग केला.सत्ताधार्‍यांनो, कुठे आहे. कोरोना नियमांचा धर्म ? या नियमभंग करणार्‍यांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केली आहे.या देशातील शेतकरी, कामगार यांच्या हिताच्या ऐतिहासिक कायदा संसदेत बहुमताने पारित झाला. तो देशभर अस्तित्वात आला. पण देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शुख आहे.

आगामी एक काळात काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे वैचारिक दृष्ट्या भरकटलेल्या राज्यातील तिघाडी सरकार भाजप व पंतप्रधान द्वेषाने पछाडले आहे. राज्यातील कोरोना काळात आरोग्याची कोलमंडलेली व्यवस्था सुधारण्याऐवजी लोकांचे ध्यानी अन्यत्र वळविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री ‘लॉंगमार्च’ चा ‘शो’ करित आहेत. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जो नांदेड शहरात लॉगमार्च निघाला त्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.

काही प्रमुख नेत्यांनाच मास्क नव्हते एरवी ‘कोरोना संदर्भात उपदेशाचे’ डोस देण्यार्‍यांनी लॉगमार्च मध्ये मात्र नियमांचा पायदळी दुडविला. ज्याच्यासाठी म्हणजे शेतकर्‍यांसाठी हा लॉंगमार्च होता पण मोर्चात लॉंग. लॉंगवर सुद्धा (दुर-दुरवर सुद्धा) शेतकरी, कामगार आढळला नव्हता. शेतकरी, कामगाराऐवजी कार्यकर्तेच जास्त होते. सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदार, पदाधिकारी यांना कोरोना बाबत किती जागृकता आहे. जिल्ह्यातील जनतेनी पाहिला आहे.

आता कुठे गेला. सत्ताधार्‍यांनो तुमचा कोरोनाधर्म, नियम भंगाची जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस प्रशासन यांना दिसत नाही काय ? असा सवाल उपस्थित करत भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी कोरोना नियमभंग करणार्‍या काँग्रेस मोर्चा कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान 29 ऑगस्ट रोजी भाजपने मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.

त्यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवत भाजपा पदाधिकारी , कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तर सगळे नियम धाब्यावर बसविण्यात आले असून गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here