देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट ५८ टक्क्यांहून अधिक…तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे…एकूण रुग्ण संख्या पाच लाखांच्या पुढे

नवी दिल्ली- कोरोना साथीच्या आजारामध्ये संसर्ग झालेले ५८.१३ टक्के रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार निरोगी रूग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या तुलनेत सुमारे एक लाख जास्त आहे.

मात्र, देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या पाच लाखांच्या पुढे गेली आहे. परंतु सक्रिय प्रकरणे दोन लाखांपेक्षा कमी आहेत. अ‍ॅक्टिव्ह केस म्हणजे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांचा संदर्भ.

शनिवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासांत १९,९०६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून संक्रमित रूग्णांची संख्या ५,२८,८५९ पर्यंत वाढली आहे. यावेळी ४१० लोकांचे प्राणही गेले आहेत.

या साथीच्या आजारामुळे आतापर्यंत १६,९९५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३०९७१३ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि सक्रिय रुग्णांची संख्या २०३०५१ आहे. सक्रिय प्रकरणांतून बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्रात ६३६८ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. एका दिवसात ही सर्वात मोठी नवीन प्रकरणे आढळली आहेत. राज्यात आतापर्यंत १,५९,१३३ संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ७२७३ लोकांनी आपला जीव गमावला आहे. शनिवारी रुग्णालयातून ४४३० रूग्णांना सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत, ८४२४५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here