बोईसर | टीमा रुग्णालयातील कोरोना रुग्णाच्या मदतीला सरसावले…ओम साई पदयात्री मित्र मंडळ

विनायक पवार – पालघर

पालघर तालुक्यातील बोईसर येथील भंडारवाडा ओम साई पदयात्री मित्र मंडळ यांच्याकडून खैरे पाडा येथील टिमा कोरोना सेंटर मधील कोरोना बाधित रुग्णांना करता सुमारे 2150 सलाईन चे वाटप टिमा सरकारी कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री मनोज शिंदे व टिमा रुग्णालयातील वैद्यकीय सहकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

समाज कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या ओम साई पदयात्री मित्र मंडळ बोईसर भंडारवाडा यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून सद्या कोरोणा काळात कोरोणा रुग्णाच्या मदतीला सद्या पुढाकार घेत आहेत.

ओम साई पदयात्री मित्र मंडळ बोईसर येथील मंडळाच्या सदस्यांनी पुढे येऊन स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने खैरापाडा येथील कोविड सेंटरला 2150 सलाईन वाटून रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ओम साई पदयात्रा मित्र मंडळ चे कौतुक केले असून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल असे डॉक्टर श्री मनोज शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ओम साई पदयात्री मंडळाचे श्री प्रशांत ठाकूर, श्री हितेश संखे, श्री मिलिंद पाटील, श्री मनोहर वडे, श्री गणेश गोरे, श्री कल्पेन मेहेर, श्री हरेष चौहान,श्री सुशील गुप्ता, श्री पप्पू मेहेर, श्री पप्पू मेस्त्री,श्रि अनिल किणी,कु. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेट देण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी हितेश मनोहर संख्ये यांनी सेंटर येथील अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टर नर्स कर्मचारी सफाई कर्मचारी यांचे आभार मानून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here