नागपूर | हिंगणा तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव…तहसील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह…

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर -हिंगणा :- हिंगणा तहसील कार्यालयातील कर्मचारी यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तहसील कार्यालयात व परिसरात खळबळ उडाली आहे. काही तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी कोरोना तपासणी केली होती.

तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हिडं तपासणी केंद्राकडून पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू आहे. नुकतीच त्यांची तपासणी करण्यात आली होती.

आज दि.०२ जुलै ला त्यातील १ तहसील कर्मचारी यांचा अहवाल पोझिटिव्ह आला .हे कर्मचारी दररोज ग्रामीण भागात आपल्या कार्यक्षेत्रातून कामे आटोपून तहसील कार्यालयात येत होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त होताच हिंगणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पडवे व हिंगणा तहसीलदार संतोष खांडरे यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले

तसेच संपूर्ण तहसील कार्यालयात तात्काळ सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या काही नायब तहसीलदार , तलाठी व कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनटाईन करण्यात येणार अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

तसेच तहसील मधीलच कर्मचारी कोरोना पाझेटीव्ह निघाल्यामुळे तहसीलदार यांना विचारना केली असता तालुका आरोग्य अधिकारी यांच्या निर्देशानुसार तहसील मधील कर्मचारी कोरोनटाईन होण्यास तय्यार आहे.व तहसील क्षेत्रातील अति महत्वाच्या कामाने नागरिकांनी कार्यालयात यावे विना कारण कार्यालयात येऊ नये अशी सूचना सुद्धा त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here