कोरोनाचा नागपूर कारागृहात शिरकाव…कारागृहातील ४४ कर्मचारी व कुटुंबीय बाधित…७३ नविन कोरोनाबाधितांची भर…

फाईल – फोटो

शरद नागदेवे, नागपूर

नागपूर -कोरोनाने मध्यवर्ती कारागृहात कालच शिरकाव केला होता.अधिकाऱ्यांनसह ९ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले होते.बुधवारी नव्याने ४४ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत.त्यात कारागृहातील कर्मचारी व त्यांचा कुटुंबीयांचा समावेश आहे.शहरात आज एकाच दिवशी ७३ कोरोनबाधित निघाले.नागपूरात रोज कोरोना एका नव्या वस्तीत प्रवेश करित होता.आता कारागृहात शिरकाव केला आहे.

मध्यवर्ती कारागृहातील एका कर्मचाऱ्याची २५ जून पासून प्रकूर्ति खालावली होती.त्याला २७ जूनला मेडीकल रूग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्यात लक्षणे होतीच त्याचा स्वॅब घेऊन तो चाचणणीस पाठवला असता २८ जूनला पॉझिटिव्ह आला.कारागूह प्रशासनाने तातडीने हालचाल करिता कारागृहात वैद्यकीय पथकाला बोलवून त्यांचाकरवी संपूर्ण अधिकार व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले.

त्यात ९ पॉझिटिव्ह निघाले, निरिक्षक, हवालदार, शिपाई आदिंचा त्यात समावेश आहे.त्यांचा संपर्कात आलेले इतर कर्मचारी व त्यांचा कुटुंबीयांना काल क्वारंनटाईन करण्यात आले.कारागूहातील प्रशासनाचे ४४ नमुने पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली, कारागृहातील बाधितांची संख्या ५३ झाली आहे.आज एम्स प्रयोगशाळेत लॉ कॉलेज क्वारंनटाईन सेंटर मधील

४,व्याहाड पीचसी २,वनामती क्वारंनटाईन सेंटर ३,मेयो प्रयोगशाळेत १,कामठी लष्करी रुग्णालयातील ६, लोहापूरा बजेरीया १,मोमीणपूरा १,हसनबाग १,विनोबा भावे नगर १,काटोल १,डागा रुग्णालय १, खाजगी प्रयोगशाळेतील ७,नीरी प्रयोगशाळेतील मध्यवर्ती कारागृहातील ४४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.बूधवारी ऐकून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५७८ झाली आहे.आतापर्यंत ऐकून १२७३ कोरोनामुक्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here