नागपुर जिल्ह्यात आज नविन ७१० कोरोना बाधितांची भर…८ रुग्णांचा मृत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

नागपुरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंनदिवस वाढ होत आहे.आज सोमवार दि.२२ फेब्रुवारी रोजी ५९३८ लोकांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये ७१० लोक कोरनाबाधित आढळून आले.यामध्ये शहरात ६४१ व ग्रामीण मध्ये ६७ व जिल्ह्या बाहेरचे ८ कोरोणा बाधितांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात १४३८४३ कोरोनाबाधित झाले आहेत.आज ८ कोरोनाबाधित रूग्णांचा मुत्यू झाला असून यामध्ये शहरात ४,ग्रामीण २ व बाहेरील २ रुग्णांचा मुत्यू झाला आहे.कोरोनाबाधित रुग्णांची मूत्यूची संख्या ४२८३ वर पोहचली आहे.

आज ४३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून.कोरोना पासून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १३३२९८ वर पोहोचली आहे.सध्या नागपूरात कोरोनाचे ६२६२ अॅक्टिव पेशंट असून त्यात शहरातील ५१६९ व ग्रामीण भागातील १०९३ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here