नागपूरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे पुढील निर्णय घेत असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले…

नागपूर – शरद नागदेवे

नागपुरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी पुढिल निर्णय जाहीर केले आहे. आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद.. मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद…

7 मार्च पर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील. हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील..सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्च पर्यंत बंद राहतील..

मंगल कार्यालय 25 फेब्रुवारी नंतर 7 मार्च पर्यंत बंद राहणार… त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल…मंगल कार्यालय मध्ये 7 मार्च पर्यंत लग्न होणार नाही..

बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार. नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here