नागपूर जिल्ह्यात ७,३४९ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त…नवीन ४,१८२ कोरोना बाधित रुग्णांची भर…७१ कोरोना बाधित रुग्णांचा मूत्यू…

नागपूर ‌- शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात दि.४/५/२०२१ रोजी १९,४६८ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली यामध्ये ४,१८२कोरोना बाधित रुग्ण आढळले असून शहरातील २,४९८ व‌ ग्रामीण क्षेत्रातील १,६७४ व‌ बाहेरील १० रूग्णांचा समावेश आहे.

दिलासादायक बातमी जिल्ह्यात ७,३४९ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील ४,९१५ व ग्रामीण क्षेत्रातील २,४३४ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ७१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील ४०, ग्रामीण क्षेत्रातील २१ व‌ बाहेरील १० रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ६९,१९९ कोरोना बाधित रुग्ण उपचाराधीन असुन शहरातील ३८,८८४ व ग्रामीण क्षेत्रातील ३०,३१५ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here