नागपूर जिल्ह्यात ६,३३८ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त…नविन ४,९०० कोरोना बाधित रुग्णांची भर…८१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात आज दि.६/५/२०२१ रोजी २१,८७८ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली यामध्ये ४,९०० कोरोना बाधित रुग्ण आढळले असून शहरातील २,७२० व ग्रामीण क्षेत्रातील २,१६७ व बाहेरील १३ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ६,३३८ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील २,७४० व ग्रामीण क्षेत्रातील २,५९८ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ८१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील ४७, ग्रामीण क्षेत्रातील २१व बाहेरील १३ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ६४,५९७ कोरोना बाधित रुग्ण उपचाराधीन असून शहरातील ३५,५८१ व ग्रामीण क्षेत्रातील २९०१६ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here