नागपूर जिल्ह्यात ७,४०० कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त…नविन ४,३९९ कोरोना बाधित रुग्णांची भर..८२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात आज दि.५/५/२०२१ रोजी २१६१२ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४,३९९ रुग्ण कोरोना बाधित आढळले असून शहरातील २,५३४ व ग्रामीण क्षेत्रातील १,८५३ व बाहेरील १२ रूग्णांचा समावेश आहे.

दिलासादायक जिल्ह्यात ७,४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील ४,६८२ व ग्रामीण क्षेत्रातील २,७१८ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ८२,कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील ४८, ग्रामीण २२,व बाहेरील १२ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ६६,११६ रूग्ण उपचाराधीन असून शहरातील ३६,६४८ व ग्रामीण क्षेत्रातील २९,४६८ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here