वाशीम | मंगरुळपीरात कोरोनाचा भड़का…नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे…

पवन राठी
वाशिम
आज दुपारी ११ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ०४ व्यक्ती कोविड१९ बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित ०७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.

बाधितांमध्ये एकाच कुटुंबातील ३७ वर्षीय पुरुष, ६५ व ३२ वर्षीय महिला व ०७ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

हे सर्वजण बिलाल नगर, मंगरुळपीर येथील असून ते अकोला येथे उपचार घेत असलेल्या बाधिताच्या संपर्कातील आहेत.

मंगरुळपीर येथील नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे व शासकीय नियमाचे पालन करावे घराच्या बाहेर येऊन गर्दी करु नये महाव्हाईस न्युज कडून आपल्याला आव्हान करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here