कोरोना आपत्ती काळात आमच्या डी.एम.एफ.सर्च ॲण्ड रेस्क्यु टीम ने गेल्या दहा महीण्यात केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापन सेवेने निभावला मानवता धर्म…

दीपक सदाफळे

COVID-19 disaster आपत्ती काळात.प्रशासना सोबत राहुन त्यानुसार “कोव्हीड सेप्टी प्लॅन” करुन स्वताच्या जिवाची पर्वा न करता विवीध आपात्कालीन घटनांमध्ये सेवा देत गेल्या आठ महीण्यात (39) लोकांना जिवनदान देऊन वाचविले,यासह विविध घटनांमधुन (22) लोकांचे मृतदेह सर्च ऑपरेशनद्वारे शोधुन बाहेर काढले,

तसेच रस्ते अपघातातील जखमींना क्षणाचाही विलंब न करता पथकाच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी पोहचुन प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात पोहचुन सेवादीली या मध्ये सुद्धा (50) नागरिकांना वाचविले.या कोरोना आपत्ती काळात जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी एकुण रेस्क्यु ऑपरेशन पैकी 5 रेस्क्यु ऑपरेशन आपल्या जिवाची पर्वा न करता यशस्वी केले. आणी यामध्ये सहा-सात लोकांना वाचविले हे विशेष.

ऑपरेशन पैकी 1 पिंजर येथे सईदभाई यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडर व शेगळी ने पेट घेतल्याने आग लागली असता तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन राबवुन आग लागलेल्या खोलीतील पेटलेले साहीत्य एक एक करुन बाहेर काढले आणी पेटलेले सिलेंडर शेगडीसह खोली बाहेर काढुन तात्काळ शेगळी वेगळी केली व पेट घेतलेले सिलेंडर हे वेटाळा बाहेर सुरक्षितस्थळी नेले यामुळे मोठा अनर्थ टाळला.

2 कानशिवणी येथे मध्य रात्री एका विहीरीतुन गरोदर मातासह तीच्या मदतीसाठी खाली अडकलेले वडील आणी एक इसम अशा तीघांना रेस्क्यु करुन सुखरुप बाहेर काढले,3 भेंडीमहाल येथील महीलेने फासी घेतली असता तीला पिंजर प्रा.आ.केंद्रातुन कुठल्याही प्रकारची हालचा नसल्याने बेशुद्ध अवस्थेत तीला अकोला येथे नेत असतांना नातेवाईकाची परवानगी घेऊन चालु गाडीत CPR देत तीला शुद्धीवर आणले.

4 गोरव्हा येथे मुंबईहुन आलेली महीला आत्महत्या करण्याच्या दृष्टीने पाण्याच्या टाकीवर चढली तीला रेस्क्यु ऑपरेशन करुन सुखरुप खाली काढले.5 पिंजर कारंजा रोडवर पाराभवानी येथील अपघात एक जण ट्रकच्या धडकेने गंभीर जखमी होऊन खाली कोसळला यामुळे गळ्यात असलेल्या शेल्यामुळे त्याला फासी बसली होती यावेळी तो कुठलीच हालचाल करत नव्हता जिभ सुद्धा बाहेर पडली होती यावेळी क्षणाचाही विलंब न करता धाव घेऊन घटनास्थळी त्याच्या तोंडातील रक्ताच्या गीठोळ्या काढुन माती घाण काढुन स्वच्छ केले आणी दोन स्टेप मध्ये cpr दीला तेव्हा तो इसम शुद्धीत आणला,

अशी दीली सेवा COVID-19 disaster या काळात जिल्हयातील अत्यावश्यक अणेक रुग्णांना तसेच संकटसमयी आवश्यक गरजुवंताना आणी या कालावधीत अपघातातील जखमींना घटनास्थळी पोहचुन रुग्णवाहिकाद्वारे सेवा दीली.याही परीस्थितीत गरोदर स्त्रियांना तसेच बाळंतीन मातांना बाळांसह. सेप्टी मॅनेजमेंट प्लॅननुसार हाॅस्पिटल,आणी आप आपल्या निवासस्थानी सुरक्षितपणे पोहचुन दीले. तसेच एकुण विवीध घटनेतील (39) मृतदेह पोहचुन दीलेत.

तेही केवळ प्रवासासाठी डीझल वरच. आणी विषेशतः महत्वाचे की पावसाळ्यात पुर्णा, काटेपुर्णा,ज्ञानगंगा, पेढी,अडाण,पैनगंगा,मोर्णा ईत्यादी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या नागरिकांचे मृतदेह सर्च ऑपरेशन राबवुन शोधुन बाहेर काढले.अकोला व वाशिम जिल्ह्यात अणेक गावांमध्ये जाऊन दगडपारवा धरण,काटेपुर्णा धरण, यासह अणेक ठीकाणी विहीरींमधील बेपत्ता असलेल्या मृतदेहांना शोधुन बाहेर काढलेत,सर्च ऑपरेशन यशस्वी केले.

बार्शीटाकळी तालुक्यातील अचानकपणे मुसळधार पाऊस आणी तीन गावात विज कोसळून घटना घडल्या यावेळी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी एकदोन ठीकाणी विषेशतः सहकार्य केले.या कालावधीत पाच वेळा आपत्ती व्यवस्थापन जणजागृती कार्यक्रम केलेत.सोबतच COVID-19 disaster या कालावधीत शासनाच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्गजन्य परीस्थिती थांबविण्यासाठी जणजागृती कार्यक्रम राबवून सोशल डीस्टंस,

फवारणी,कोविड योद्धा पोलीस मित्र,सोशल मिडीया जणजागृती कार्यक्रम राबवून सेवादीली.यावेळी हजारांच्या वर प्राथमिक आरोग्य केंद्र,ते जिल्हारुग्णालय येथे रुग्णांना ने आण करण्यासाठी सेवा दीली, याहीपुढेही असेच मानवसेवा आणी मानवरक्षा निरंतरपणे शेवटच्या श्वासापर्यंत चालुच ठेऊनजणतेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी आंम्ही सदैव तत्पर राहणार असल्याचे मत यावेळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here