नागपूर जिल्ह्यात नविन ८९९ कोरोना बाधितांची भर…५ रुग्णांचा मुत्यू…५७५ कोरोनामुक्त..

शरद नागदेवे

नागपूर – आज दि.२८ फेब्रुवारी रविवारी रोजी ११५४२ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली.यामध्ये शहर ७६१९ व ग्रामीण क्षेत्रातील ३९२३ लोकांचा समावेश होता.चाचणी मध्ये ८९९ कोरोना बाधित आढळले असून शहरातील ७२२ व ग्रामीण क्षेत्रातील १७४ व बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज ५ रुग्णांचा मुत्यू झाला असून शहरातील २, ग्रामीण ० व बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे आज.५७५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १,४९,७८८ वर पोहचली आहे.

नागपूर सध्या अॅक्टिव केसेस ८२३५ असून शहरातील ६९०१ व ग्रामीण क्षेत्रातील १३५२ आहे.एकून १,३७,२०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.एकून ४३३५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here