मनसर येथे रूट मार्च द्वारे केली कोरोना विषयक जागृती…

रामटेक – राजु कापसे

ग्राम पंचायत मनसर येथे पंचायत समीती, महसुल विभाग, पोलिस तथा स्थानीक ग्रा.पं. प्रशाषण यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. १८ एप्रील ला सकाळी ११ वाजता दरम्यान रूट मार्च काढुन जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने अधिकारी वर्ग उपस्थित होता.

सदर रूट मार्च पूर्वी ग्राम पंचायत कार्यालयात कोरोना विषयक जनजागृतीच्या पत्रकाचे विमोचन करण्यात आले,त्या पत्रकाचे वितरण रूट मार्च च्या दरम्यान करण्यात आले.रूट मार्चमध्ये तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, ग्राम विकास अधिकारी,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी,केंद्र प्रमुख, शिक्षक, पोलीस अधिकारी व ग्राम पंचायत सदस्य यांनी लसीकरण,

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, तसेच अंगावर जास्त दिवस ताप न येऊ देता ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे जाऊन कोरोना विषयक तपासणी करून घ्यावी व पोझिटिव्ह आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा, होम कोरोन्टाईन राहावे असे ग्रामस्थांना कोरोना विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थितांमध्ये बाळासाहेब मस्के तहसीलदार रामटेक, प्रदीप बमनोटे गट विकास अधिकारी पंचायत समिती रामटेक, सोनवणे व बोरकर पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन रामटेक, हुद्दार एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय रामटेक, राजेश जगणे सांख्खीकी विस्तार अधिकारी,

रामकृष्ण कुबडे आरोग्य विस्तार अधिकारी,राजकुमार पचारे केंद्र प्रमुख मनसर,वाहने गुरुजी,भोयर गुरुजी,सौ.योगेश्वरी हेमराज चोखांंद्रे सरपंच ग्राम पंचायत मनसर, चंद्रपाल नगरे उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्या संगीता पंधराम, नंदकिशोर चंदनखेडे, प्रा.हेमराज चोखांद्रे,दिनेश पंधराम, ग्राम विकास अधिकारी जीवनलाल देशमुख व ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here