कंत्राटी कामगारांना वीज वितरण कंपनीने कायम करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा…

सांगली – ज्योती मोरे.

वीज वितरण कंपनीने साडेचार हजार विद्युत सहाय्यक पदांसाठी होत असलेली भरती थांबवून, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावे. अन्यथा मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघटनेने दिलाय.

यासंदर्भात नुकतेच सांगलीतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, प्रसिद्धीप्रमुख आसिफ मुलानी, आली मालगावे, शंकर माळी, महादेव साळुंखे आदी पदाधिकाऱ्यांसह कंत्राटी कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here