मनसेच्या दणक्याने सरकारी दवाखान्यातील कंत्राटी कोरोना १६० कामगारांचा प्रलंबित २ महिन्याचे थकीत वेतनाचा प्रश्न निकाली…

मनसेची वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालावर कामगारांनसोबत धडक…..
कामगारांनी मनसेचे मानले आभार….
कामगारांची दिवाळी गेली होती अंधारात…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या काळात येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जवळपास १६० कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती.कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या नशिबात मात्र रुगणालायच्या निष्काळजीपणामुळे त्यांची दिवाळी अंधारात काढण्याची वेळ आली.

आपल्या हक्काच्या पगारासाठी सरतेशेवटी त्यांनी मनसे कडे धाव घेतली.या प्रश्नाचे गंभीर्य आणि कामगारांची व्यथा ऐकताच मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी या विषयाचा जाब विचारण्यासाठी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे आपल्या कार्यकर्त्यांसह धडक दिली.या ठिकाणी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांच्याशी या कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि या कामगारांना न्याय मिळवून देण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रसार लक्षात घेता त्या काळात या कामगारांना कंत्राटी पद्धतीने रुग्णाची सेवा करण्यासाठी म्हणजे त्याची स्वछता ठेवणे, संडास बाथरूम साफ करणे, कोरो रुग्णांचे मृत देह उचलून नेणे,कोरोना वॉर्डात रुग्णाची सर्व कामे ही कंत्राटी कामगार करत होती.एवशी सेवा देऊनही रुगणालायच्या काही बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे या कामगारांना गेल्या २ महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही.

एकीकडे शासन कोरोनवर एवढा भरमसाठ खर्च करत आहे परंतु खऱ्या अर्थाने कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या आणि यवतमाळ करांची दिवाळी आनंदात जाण्यासाठी अविरत सेवा देणाऱ्या या कोरोना योद्धय्यांनाच आपली दिवाळी रुगणालायच्या गलथान कारभारामुळे अंधारात घालवावी लागली.कामगारांना आपल्या व्यथा मांडण्यासाठी मनसेकडे धाव घेतली.या प्रश्नाची गंभीर दखल घेत मनसेने रुगणल्यावर धडक दिली.

या ठिकाणी रुग्णालय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी मनसेच्या शिष्टमंडळाशी या विषयावर चर्चा केली.या प्रसंगी देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेता या कामगारांच्या वेतन प्रश्नासंदर्भात आपल्याला कल्पनाच नसल्याचा धक्कादायक खुलासा डॉ भुयार यांनी या प्रसंगी केला.

वास्तविकतेत या पगाराची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांवर असते त्यांनी यांचे बिलच टाकले नसल्याची माहिती या प्रसंगी समोर आली.म्हणजे एका कर्मचाऱ्यांच्या निष्कळजीपणामुळे १६० कर्मचारी आपल्या हक्काच्या वेतानापासून वंचित राहिले.या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी या प्रकरणात दोषींवर कार्यवाहीची मागणी केली.

या वेळी कामरगारांचे त्यांच्या सुरक्षते च्या दृष्टिकोनातून इतर प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन कामगारांना त्याच्या हक्काचा २ महिन्याचा पगार तात्काळ देण्याचे आश्वासन डॉ. भुयार यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.

कामगारांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आमचा वेतनाचा प्रश्न निकाली निघाल्याची भावना या प्रसंगी कामगारांनी व्यक्त करत जिल्हा मनसेचे आभार व्यक्त केले. या प्रसंगी चर्चेदरम्यान कामगार प्रतिनिधी आणि मोठ्या प्रमाणात कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here