कंटेनर व कारचा भिषण अपघात…एका पत्रकारासह ४ जण जागीच ठार…

खामगाव ते अकोला रोडवर कंटेनर व कारचा भिषण अपघात होवून कारमधील ४ जण जागीच ठार झाल्याची घटना आज दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्राळा फाट्यानजीक घडली असून यात अकोल्यातील दैनिक भास्कर मधील उपसंपादक पदावर राहून गेलेलं अतुल व्यवहारे यांचा हि समावेश होता.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील रहिवासी चार जण मारोती कार क्रमांक एमएच २७ आर ३६३२ ने खामगावकडून अकोलाकडे जात होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्राळा फाट्यानजीक अकोलाकडून खामगावकडे येणाऱ्या कंटेनर क्रमांक आरजे १८ जीबी २५५९ ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारला जोरदार धडक दिली.

यावेळी झालेल्या भिषण अपघातात मारोती अल्टो कारचा चुराडा होवून कारमधील निलेश मनोहर जोशी, राहुल सातळे, अतुल व्यवहारे, विनोद शंकर बावणे सर्व रा.बाळापूर रोड शिवनगर अकोला या चौघांचा जागेवरच मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतकांचे शव येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असून पुढील कारवाई सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here