कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवन बांधावे – प्रल्हाद इंगोले यांची पालकमंत्र्याकडे मागणी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्यांना थांबण्यासाठी किंवा जेवण करण्यासाठी जागा नसल्याने शेतकर्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे यापूर्वी असलेले शेतकरी भवन पाडून त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्यात आले.

त्यामुळे पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकर्यांना थांबण्यासाठी एक शेतकरी भवन उभारावं अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा शेतकरी मित्र फार्मर प्रोडय़ुसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कडे केली आहे.

दीपावलीनिमित्त पानसुपारीचा कार्यक्रमासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमाला आले असता आडते व व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयात संवाद साधताना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले म्हणाले की काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या,

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थांबण्यासाठी कुठेही जागा नाही दुपारी जेवण करतो म्हटलं तर शेतकर् यांना बसण्यासाठी जागा नसल्याने कुठेतरी रस्त्याच्या कडेला बसून शेतकर्यांना जेवण करावे लागत आहे ही बाब मनाला खटकणारी आहे.

अन्य तालुक्यातून शेतमाल घेऊन आलेल्या शेतकर्यांना थांबण्यासाठी मार्केट कमिटीच्या आवारात सुसज्ज असं शेतकरी भवन उभारावा जेणेकरून शेतकर्यांना थांबता येईल गरज पडल्यास मुक्काम करता येईल त्यासाठी काही शुल्क आकारले तरी शेतकरी सहज देतील.

अशी मागणी केली .यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर ,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा , माजी राज्यमंत्री डी पी सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर ,व्यापारी असोसिएशनचे प्रल्हादराव काकांडीकर, बद्रीनारायण मंत्री , प्रवीण कासलीवाल ,गोपाल धूत ,बालाजी पाटील भायेगावकर यांच्यासह व्यापारी खरेदीदार आडते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here