भंडारज खुर्द येथे संविधान उद्देशिका वितरण वाचन कार्यक्रम संपन्न…

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील ग्राम भंडारज खुर्द येथे ग्रा प भवन मध्ये दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा प्रशासन जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थान (बार्टी) पुणे अंतर्गत ७५ हजार संविधान सादीर ग्राम अभियानाच्या माध्यमातून पातुर तालुक्यातून ग्राम भंडारज खुर्द या गावाची निवड सविधान सादर ग्राम अभियान करिता निवड झाली असून ग्राम भंडारज खुर्द येथील ग्रा प भवन मध्ये ग्रा प सचिव आर डी अरखराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सविधान अभियान वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

या सदर अभियान संविधानाचा पुरेपूर ओळख गावातील तरुण व ज्येष्ठ महिला वृद्ध व शेतकरी सर्व स्तरातील नागरिकांना व्हावी याकरिता हा कार्यक्रम पातुर तालुक्याच्या समतादूत समता रा तायडे यांनी गावांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले सविधान सादर ग्राम अभियाना अंतर्गत पर्याय आरक्षण आणि संविधान भारताचा आत्मा अशा दोन विषयांवर प्रबोधन व्याख्यानमाला ग्रामस्थांसाठी समता तायडे यांनी आयोजित केला.

सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर संदीप भोवने व आकाश पवार यांनी वरील दोन विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सरकटे यांनी केले आणि या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रा प सचिव आर डी अरखराव यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेचे वितरण वाचन करून केले या कार्यक्रमाच्या वेळी गावातील ग्रा प सरपंच उपसरपंच ग्रा प सदस्य गण ग्रा प रोजगार सेवक ग्रा प ऑपरेटर व गावातील महिला बचत गट चा महिला व शेतकरी व ग्रामस्थांची बहुसंख्य उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here