‘संविधान विशेष विषय म्हणुन शिकणे आवश्यक” – संस्थापक पंकज धंदर…

बिईंग आर्टिस्ट अकॅडमि ऑफ फिल्म्स अँड थेटर आर्ट येथे संविधान दिन साजरा…

भारतीय संविधानाचे घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या सम्मानार्थ अमरावती स्पंदन परिवार बहुदेदेशीय संस्था संचालित बिईंग आर्टिस्ट अकॅडमि ऑफ फिल्म्स अँड थेटर आर्ट तर्फे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात अकॅडमि मध्ये प्रास्ताविक, उद्देशिका व राष्ट्रगीत म्हणून साजरा करण्यात आले, त्यानंतर संस्थेचे संस्थापक पंकज धंदर यांनी भारतीय संविधानाला संबोधून ‘भारतीय संविधान हे प्राथमिक शिक्षणापासुन तर उच्च शिक्षणा पर्यंत विशेष विषय म्हणून शिकवण्याची आवशक्यता असल्याचे मत व्यक्त केले.

सोबतच सर्व विद्यार्थ्यांनी शेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यासमोर उपस्थित मान्यवरांसोबत संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून प्रास्ताविकेच्या प्रतीचे वाटप केले, संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच अमरावती शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रत्येकी दोन विद्यार्थी शहरातील विविध चौकामध्ये उभे राहून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप केले गेले,

त्यावेळी कार्क्रमाला संचालक स्नेहा वासनिक , संस्थापक पंकज धंदर, नंदकिशोर गवळी ,अमित जगताप ,पंकज तोवर उपस्तित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष खांडेकर यांनी केले ,तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्तिक पवार ,नागेश रंगारी ,हर्षल कुराडे , आकाश पांडे ,मयूर चौधरी ,प्रज्वल वानखडे ,पवन ठाकरे ,सूरज सिंग चौहान , अक्षय डफडे यांनी अथक परिश्रम घेतले …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here