दानापूर – गोपाल विरघट
स्थानीक तेल्हारा येथील मिलिंद नगर येथे मिलिंद मंडळा तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला, तसेच २६/११ च्या आतंगवादी हल्लात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिण्यात आली, यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुध्द, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले,
यावेळी संविधान दिनाची माहिती किशोर सरदार व २६/११ च्या हल्लाची माहिती अक्षय दामोदर यांनी दिली, या वेळी कार्यक्रमाला मिलिंद मंडळाचे संघर्ष बोदळे, किशोर सरदार, अक्षय दामोदर, सुरज सिरसाट, मिलिंद हिवराळे, उमेश वानखडे, आकाश भारसाकळे, विनोद तायडे, रवि पोहरकार, संमेक बोदळे, अजय हिवराळे, शेखर हिवराळे, शिधान बोदळे, विशाल बोदळे, अजय भोजने, व मिलिंद मंडळाचे कार्यकर्ते उपस्थि होते.