बुलढाणा – अभिमान शिरसाट
चिखली तालुक्यातील सवणा येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुधाकर माघाडे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक पी.बी. इंगोले जिल्हा जिल्हा सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा तर प्रमुख अतिथी एकनाथ बोर्डे जिल्हाप्रमुख समता सैनिक दल ,अजबराव साळवे केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा, सदाशिव खिल्लारे तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मधुकर मिसाळ, प्रल्हाद कांबळे . चिंधाजी गवई,आनंदा गवई, सूर्यभान सुरडकर होते. यावेळी सर्व मान्यवरांनी भगवान बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज व भारताचे संविधान स्तंभ यांना हार अर्पण करून पूजन केले.

प्रमुख मार्गदर्शक पी.बी. इंगोले यांनी भारतीय संविधान दिना बद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .त्यांनी सांगितले की 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी या दिवसापासून संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली.
भारतीय संविधान लिहिण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्षे 11 महिने 17 दिवस अथक परिश्रम करून बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना अर्पण केली असे सांगितले. व भारताच्या संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्वांना यावेळी शपथ दिली. यावेळी संपूर्ण गावांमधून संविधान रॅली काढून संविधाना बाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर मिसाळ यांनी केले तर सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस दीपक कस्तुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास शिरसाट ,शाहीर मधुकर साळवे, मारोती सुरडकर ,भीमराव मानकर, केशव शिरसाठ, दिनकर तायडे ,गणेश तायडे,
संगीता शिरसाठ, आशा कस्तुरे, सुशीला कस्तुरे ,जिजाबाई सुरडकर ,यमुनाबाई कस्तुरे ,नर्मदाबाई शिरसाट , शशिकला समाधान कस्तुरे ,जिजाबाई शिरसाट ,शारदा पवार, वंदना कस्तुरे, कौशल्याबाई सुरडकर ,सुशीला दौलत कस्तुरे, वच्छलाबाई कस्तुरे, सुलोचना शिरसाट ,निकिता पवार यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंदा गवई तालुका पर्यटन विभाग उपाध्यक्ष यांनी मानले.