निपाणी पोलीसात मानाचा तुरा; काँन्स्टेबल शेखर असोदे यांना मुख्यमंत्री सुवर्ण पदक प्राप्त…

राहुल मेस्त्री

कर्नाटक पोलीस दलात उत्तर कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कर्नाटक सरकार मार्फत मुख्यमंत्री सुवर्ण पदक देण्यात येत असते. यंदा यामध्ये बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या निपाणी पोलीस दलातील पोलीस काँन्स्टेबल श्री शेखर असोदे यांना मुख्यमंत्री सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.

काँन्स्टेबल श्री शेखर असोदे याचा जन्म 1985 रोजी बेळगाव जिल्ह्याच्या कागवाड तालुक्यातील एका गावात झाला .लहानपणापासून पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न साकार करणारे असोदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन शिक्षण घेतले. आणि 2009 साली कर्नाटक पोलीस दलात भरती झाले. प्रशिक्षणानंतर पहिले पोस्टिंग निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मिळाले.

त्यानंतर काहीवर्षानंतर ते आजतागायत निपाणी मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयात सेवा बजावत आहेत. गेल्या आकरा वर्षांपासून अत्यंत प्रामाणिक,कर्तव्यदक्ष,निष्ठेने आणि अतुलनीय केलेल्या कामगीरीची दखल घेऊन प्रशासनाने त्यांचा सन्मान केला आहे. सदर मिळालेल्या सन्मानाचे श्रेय आपल्या वडिलांना व बंधुना दिले.

आजवर प्रामाणिकपणे केलेल्या सेवेबद्दल निपाणी मंडल पोलीस निरीक्षक श्री संतोष सत्यनाईक यांचे मार्गदर्शन लाभले आहे असे ते म्हणाले. तर या मिळालेल्या सन्मानामुळे त्यांना फोनवरून व सोशल मीडियावर शुभेच्छेचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here