नांदेड – महेंद्र गायकवाड
काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात. तेवढी ताकद त्यांच्यात आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला तशी शिकवण दिलेली नाही. आम्ही गांधी विचारधारेवर विश्वास ठेवून लोकशाही मार्गाने काम करणारी मंडळी आहोत असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
हाथरस येथील येथील युवतीवर झालेला अत्याचार व त्यानंतर पीडितेवर पोलिसांकडून करण्यात आलेला परस्पर अंत्यसंस्कार मानवतेलाकाळिमा फासणारा असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.राहुल गांधी यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा अशोकराव चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून केंद्र सरकार व योगी सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करीत असल्याने काँग्रेस यापुढे संघर्ष करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
नांदेडमध्ये राज्याचे सार्वजनिक मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन गुरुवारी सायंकाळी शहरातील आय.टी. आय येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर करण्यात आले यावेळी आ.अमरनाथ राजूरकर,आ.मोहनअण्णा हंबर्डे,
जि. प. अध्यक्षा सौ. मंगाराणी आंबूलगेकर, महापौर सौ.मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान,ज्योत्सना गोडबोले,जि. प.सभापती संजय बेळगे, विजय येवनकर, विरेंद्रसिंघ गाडीवाले,किशोर भवरे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.