वाहळा येथील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली काँग्रेस…

पातुर – निशांत गवई

पातुर तालुका येथील वाहाळा गावात अनेक दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत होता त्याच्या वारंवार तक्रारी करून सुद्धा ग्रामस्थांना दिलासा मिळत नव्हता सदर परिसरातील 50 ते 60 हेक्टर जमीनीवर गहु, हरभरा, तुरीची लागवड केली आहे परंतु वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे शेताला पाणी मिळत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.

याबद्दलची तक्रार विद्युत अधिकाऱ्यांकडे केली असता ग्रामस्थांना अटाळी सब स्टेशन तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत सतत टाळत आले त्यामुळे ग्रामस्थांनी सदर प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश भाऊ तायडे यांच्याकडे केली असता त्यांच्यासमवेत गावातील शिष्टमंडळ व अकोला शहर जिल्हा अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे पाटील तसेच,

प्रदेश समन्वयक महेंद्र गवई यांनी विद्युत भवन अकोला येथे परिमंडल चे अधिकारी श्री अनिल डोये यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी जिल्हा कार्यकारी अभियंता श्री पवन कुमार कच्छोट व श्री पानपाटिल साहेब ग्रामीण विभाग प्रभारी अभियंता यांना संपूर्ण प्रकरणात चा तपास करून योग्य कारण योग्य ती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

त्या अनुषंगाने अकोला जिल्हा ग्रामीण पातुर डिव्हिजन चे अधिकारी श्री संतोष खुमकर यांना बोलावून तात्काळ लाईन सुरळीत करून देण्याकरिता सांगितले याप्रसंगी गावातील भरपूर ग्रामस्थ व काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने सहदेव वासुदेव देठे, कृष्णराव पाटील ,सोपान अवधूत मोरे, रमेश शिरसाट, मुरलीधर बोरसे, गजानन अवाती रक, महादेव मोरे,

भगवान भोकरे, ज्ञानदेव देठे, शिवदास सोहळे निलेश कोडे शैलेश मोरे विनोद मोरे प्रमोद बुटे महादेव शालिग्राम देठे भागवत बोरसे सचिन उमाळे विश्वनाथ गवई शुद्धोधन इंगळे श्रीराम उमाळे प्रकाश मोरे वासुदेव भास्कर चिकटे विनय मोरे मंगेश मोरे निलेश मोरे राजाराम मस्के शंकर ढोरे सुभाष हागे राजेंद्र मोरे संजय ठाकरे सह गावातील संपूर्ण शेतकरी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here