दिव्यात हळदी कुंकू निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची ‘पदं’ नियुक्ती…

गुरुवार दि.28/1/2021 रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने ठाणे जिल्हा दिवा शहरात पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयात ‘हळदी कुंकु आणि महिला आघाडीची पदं नियुक्तीचा’ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे दिवा विभागाचे नेते मा.मनोज कोकणे (ठाणे जिल्हा चिटणीस) यांनी केले होते.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ.सुजाताताई घाग(ठणे शहर महिला अध्यक्षा) या प्रमुख पाहुणा उपस्थितीत होत्या.त्यांनी महिलांना संबोधित करताना,म्हटले कि ‘महिलांना राजकारणात सबळ करण्यात शरद पवार यांचे मोठे योगदान’ आहे.असे प्रतिपादन केले.पुढे सौ.घागताई यांनी म्हटले की,अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी दिव्यातील महिलांनी एकत्रित यायला हवे पक्ष तुमच्या बरोबर आहे.

याप्रसंगी त्यांनी पक्षाच्या महिलांची दिवा येथील महिला आघाडी बांधून त्यांची ‘पद नियुक्ती’ केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रध्दास्थान आद.शरदचंद्रजी पवार यांच्या शुभाशिर्वादाने रूपाली चाकणकर (महिला प्रदेश अध्यक्षा),गृहनिर्माण मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पक्षाचे नेते ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड,श्री आनंद परांजपेसाहेब (ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शोभा चौरसिया,

यांची ठाणे शहर महिला सरचिटणीस पदी तर,सौ.भारती कोकणे यांची दिवा शहर महिला अध्यक्षा पदी,सौ.सविता जाधव यांची दिवा शहर महिला कार्याध्यक्षा पदी तर सौ.कविता काळे-पाटील यांची दिवा प्रभाग क्र. 27 अध्यक्षा पदी तसेच श्रीमती सारिका झरेकर यांची दिवा प्रभाग क्र.28 अध्यक्षा पदी तर सौ.संजना गावडे यांची दिवा प्रभाग क्र.27 महिला कार्याध्यक्षा पदी,

तसेच सौ. विध्या डोलाई यांची दिवा प्रभाग क्र.27 महिला सरचिटणीस पदी तर सौ. रूपली केदारे यांची दिवा प्रभाग क्र.28 महिला सरचिटणीस पदी नियुक्ती तर श्रीमती भावना दावडा यांची दिवा प्रभाग क्र.28 ‘अ’ महिला अध्यक्षा पदी निवड करून त्यांना नियुक्ती प्रमाण पत्र देऊन सौ.सुजाताताई घाग यांनी सर्व महिला पदाधिकारींना सन्मानित केले.

याप्रसंगी मा.नगर सेविका तथा ठाणे शहर कार्याध्यक्षा सौ. सुरेखाताई पाटील,सौ. ज्योतीताई निंबर्गी(महिला महाराष्ट्र प्रदेश सचिव)सौ. स्मिताताई पारकर(महिला ठाणे शहर जनरल सेक्रेटरी),सौ.वंदनाताई लांडगे(महिला वाॅर्ड अध्यक्षा),सौ. शुभांगीताई कोळपकर (महिला ठाणे शहर खजिनदार)

तसेच युवतींच्या प्रेरणास्थान पल्लवीताई जगताप (ठाणे शहर युवती अध्यक्षा), पुजाताई शिंदे (कळवा,मुंब्रा युवती अध्यक्षा) इत्यादी प्रमुख पाहुण्या उपस्थितीत होत्या.या कार्यक्रमाचे प्रस्तावित व सुत्रसंचालन श्री. सूर्यकांत कदम (दिवा शहर कार्याध्यक्ष) यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुजा मोहिते (दिवा शहर युवती अध्यक्षा) यांनी आणि त्यांच्या सहकारी युवती पदाधिकारी शितल लाड,शशिकला लोखंडे, नेहा कोकणे,संगिता कारंडे इत्यादी युवतींनी परिश्रम घेतले.शेवटी श्री.निलेश कापडणे (दिवा शहर अध्यक्ष) यांनी सर्वांचे आभार मानुन कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित केले. (या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here