चाकण विकास योजना सूचना व हरकती सुनावणी कोरोना कालावधीत घेण्यास शहर काँग्रेससह नागरीकांचा विरोध..!

राजगुरूनगर ( पुणे ) : चाकण नगरपरिषदेच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात नागरिकांनी सूचना व हरकती फेब्रु ते मार्च २०२० च्या दरम्यान नोंदवल्या आहेत.त्यांनतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडॉउन झाल्याने शासकीय कामे पुढे ढकलण्यात आली.

मात्र नागरिकांच्या सूचना व हरकतीवर सुनावणी कार्यवाही पालिका घेणार आहे.चाकण शहर जिल्ह्यात सर्वात जास्त बाधित नगरपरिषद क्षेत्र घोषित झाले आहे.त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आनंद गायकवाड यांनी केली आहे.

चाकण शहराचा विकास आराखडयासंदर्भात नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत शासकीय कामे होऊ शकली नाही.सध्या शासकीय कामे करण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे चाकण नगरपरिषदने १५/९/२० ते २९/०९/२० या दरम्यान ऐकूण ७९६ हरकती व सूचनांवर सुनावण्या घेण्यासाठी आयोजित केले.परंतु कोरोना रूग्ण वाढीचा उच्चांक खेड तालुक्यात झाला असून चाकण शहर जिल्ह्यात सर्वात जास्त बाधित नगरपरिषद क्षेत्र घोषित झाले आहे.

शासनाने पारीत केलेल्या अध्यादेश हेतूस छेद देणारे वर्तन नगरपरिषद करत असल्याची
अपर मुख्य सचिव तथा प्रधान सचिव,नगर विकास विभाग (१) यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.शासन धोरण विरोधी असून सद्याच्या कमिटीचे कार्यकाल पुढील काही दिवसांमध्ये संपुष्टात येत असून निवडणूक आचारसंहिता कालावधी अप्रत्यक्षपणे सुरू झालेला आहे.

त्यामुळे एवढ्या घाईघाईने सुनावणी घेण्याचा नेमका हेतू काय?तसेच शहरात कोरोनाचे रुग्ण रोज मिळत आहेत.याबाबत नगरपरिषद उपाययोजना करणे आवश्यक आहे.नागरिकांच्या हरकती सूचना सुनावणी कार्यवाही कालावधी वगळून मिळणार असलेने प्रक्रिया तुर्त पुढे ढकलण्याबाबत आदेश तातडीने निर्गमित होणेबाबत विनंती शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आनंद गायकवाड यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here