सांगली – ज्योती मोरे
महापालिकेच्या प्रभाग क्र १६ च्या पोटनिवडणुकित दणदणीत विजय मिळाल्याचा आनंद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाला असताना भाजपला या आनंदाने पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’, असा तर्कहीन आरोप ते राष्ट्रवादी नेत्यांवर करीत आहेत, असा प्रतिटोला युवक राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गॅब्रिएल (भाऊ) तिवडे यांनी लगावला.
भाजपचे पदाधिकारी असलेले दीपक माने यांनी नुकतेच एक पत्रक काढून पोटनिवडणुकीत झालेला पराभव त्यांना किती जिव्हारी लागला, हेच दाखवून दिले आहे. त्यांना त्यांच्या वेदना लपविता आल्या नाहीत. आमचे नेते संजय बजाज यांच्यावर ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ या म्हणीच्या आधारे त्यांनी टीका केली. वास्तविक शादी आघाडीचीच होती, आनंदही आघाडीच्या नेत्यांनीच साजरा केलेला आहे, उलट आमच्या शादीचा आनंद भाजपवाल्यांना पहावला नाही.
आघाडीत बिघाडी झाल्याचे त्यांचे मतही तर्कहीन आहे. शिवसेनेच्या ज्या उमेदवाराने ही निवडणूक लढविली त्याने पक्षाचा आदेश न जुमानता निवडणूक लढविल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडी एकसंध आहे. त्यात बिघाडीचे दिवास्वप्न भाजपला पडत आहे.
जातीय ध्रुवीकरणाचा आरोपही माने यांनी केला आहे. वास्तविक भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वच नेते व पदाधिकारी कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत आहेत. अन्य धर्मीयांना ते उघडपणे तुच्छ लेखत आहेत. त्यामुळे जातीय, धार्मिक ध्रुवीकरण भाजपनेच केले हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञाची गरज नाही. भाजपने जे विष पेरले तेच विष त्यांच्यासाठी मारक ठरत आहे.
सर्व जाती, धर्माच्या लोकांना भाजप नेत्यांचा विखारी चेहरा कळल्याने ते त्यांच्यापासून दूर जात आहेत. त्यामुळे आमच्या आनंदाने पोटदुखी करुन घेण्यापेक्षा माने व त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करुन राजकारणात सुधारणा करावी, हाच सल्ला आहे.राष्ट्रवादीची शहरातील ताकद किती आहे अनेकदा आम्ही सिद्ध केले आहे. पुढील निवडणुकीतही ते सिद्ध करू. पैशाचा वापर करुन महापौरपद मिळविल्याचा त्यांचा आरोपही हास्यास्पद आहे.
त्यांचे नगरसेवक आम्ही फोडले नसून त्यांनी आमच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता. उलट भाजपनेच महापालिका निवडणूक लढविताना दुसऱ्या पक्षातून उमेदवार उसने घेतले. ते कशाच्या जोरावर घेतले, हे सर्व जनता जाणते. त्यामुळे माने व भाजप नेत्यांचा आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या’ या म्हणीप्रमाणे आहेत., माने याने अब्दुल्ला नावाची म्हण जाणीवपूर्वक वापरून आपल्या धार्मिक मानसिकतेचे दर्शन घडवले आहे माने याने,
सांगलीत पराभव का झाला खानापूर कवठेमंकाळ नगरपंचायत येथे डिपॉझिट का जप्त झाले आत्मपरीक्षण करावे माने यांनी हे बोलणे सकाळी बोलले की संध्याकाळी याची माहिती घ्यावी लागेल कारण निवडणूक जिंकणे हे काय ब्लॅकमेलींग करण्यासारखे किंवा खंडणी मागण्यासारखे सोपे नसते.