काँग्रेस जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर…

मुंबई, दि. २४ जून २०२०
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नऊ जिल्हा व शहर अध्यक्षांच्या नियुक्त्यांची आज घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या अनुमतीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.


या नव्या नियुक्त्यांमध्ये लातूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीशैल मल्लीकार्जून उटगे तर लातूर शहरच्या अध्यक्षपदी ऍड किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार डॉ. कल्याण काळे तर औरंगाबाद शहर अध्यक्षपदी मोहम्मद हिशम उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

णे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी ऍड. विक्रांत चव्हाण, भंडारा जिल्हा अध्यक्षपदी मोहन विठ्ठलराव पंचभाई तर गोंदिया जिल्ह्याच्या अध्यक्षपदी डॉ. नामदेव दासाराम किरसन आणि चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी प्रकाश मारोतराव देवतळे  व चंद्रपूर शहरच्या अध्यक्षपदी रितेश सत्यनारायण तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here