कोल्हापूर – राजेंद्र ढाले
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला कागल येथील गैबी चौकात वाढदिवसानिमित्त आयोजित काव्य संमेलनास चांगला प्रतिसाद मिळाला शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातून व सीमा भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कागल बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून गैबी चौकापर्यंत उत्तम कांबळे यांना मिरवणुकीने आणण्यात आले.
शुभेच्छांच्या प्रारंभी जाऊ संघर्षाच्या गावा या नावाने कवी संमेलन विक्रोळी कवी प्रा. सचिन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले परशुराम कांबळे सुरेश वडर राम बेनके किरण मिस्त्री आदींनी विद्रोही कविता सादर भन्ते एस संबोधी भन्ते राहुलजी यांच्या उपस्थितीत गडिंग्लज चे तालुका अध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या रिपब्लिकन न्यूज अंकाचे व वैभव प्रधान यांच्या संघर्ष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
गांधी नगर मधील कार्यकर्त्यांनी सोन्याची अंगठी देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शहाजी कांबळे श्रीधर शिंदे रूपाताई वायदंडे मंगलराव माळगे प्रा. श्रीधर शिंदे प्रा. अनिल माने राजू ठिपकुरली कर बाळासाहेब वशिकर अविनाश शिंदे गुणवंत नागटिळे प्रदीप मस्के राहुल कांबळे सचिन मोहिते विनोद कांबळे बी आर कांबळे बाबासो कागलकर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.