‘कॅट’च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन…

मुंबई, ६ मे २०२१: वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या टाईम (टी.आय.एम.ई.) या भारतातील आघाडीच्या संस्थेने कॅट (सीएटी) २१-२२ देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ९ मे २०२१ रोजी टाईम टॅलेंट सर्च परीक्षेचे (टीटीएसई) आयोजन केले आहे. ही परीक्षा सकाळी १० आणि सायंकाळी ६ अशा दोन स्लॉट्समध्ये ऑनलाईन घेतली जाईल.

विद्यार्थी आपल्या सोयीनुसार कोणताही स्लॉट निवडू शकतात. या परीक्षेसाठी time4education.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट क्रमांक, परीक्षेची लिंक ईमेलद्वारे पाठविण्यात येईल.

या टीटीएसईबरोबरीनेच संस्थेने एक विशेष योजना सुरु केली आहे. ही टीटीएसई देत असलेल्या आणि कॅट २०२१/२२ कोर्ससाठी १ मे ते ९ मे २०२१ या कालावधीत प्रवेश घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरसकट ३५०० रुपयांची सूट मिळवता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी आणि कॅट २०२१/२२ साठी न्यूनतम खात्रीशीर सूट मिळवण्यासाठी आपल्या जवळील टाईम (टी.आय.एम.ई.) कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here