अपघात कमी करण्यासाठी ऑटो चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन…

।। शहर वाहतूक शाखेचा उपक्रम।।*
रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या काही घटका पैकी नेत्र दोष हा एक महत्वाचा घटक आहे, अकोला शहरात प्रमाणाच्या बाहेर ऑटो चालतात, प्रवासी मिळविण्यासाठी दिवसरात्र ऑटो चालतात, रात्रीच्या वेळी चालणाऱ्या ऑटो चालकांना नेत्र दोष किंवा रातांधळेपणा हा दोष असला तर अपघात होण्याची दाट शक्यता असते, ऑटो चालक परिस्थिती मुळे किंवा निष्काळजीपणा मुळे प्रकृती कडे दुर्लक्ष करतात,

अश्या वेळी वेळीच नेत्र तपासणी केल्याने काही दृष्टिदोष असतील तर ते एखादी दुर्घटना होण्यापूर्वीच लक्षात यावे व पर्यायाने योग्य उपचार होऊन सदर दृष्टीदोष दूर होऊन ,दृष्टिदोषा मुळे होणारे अपघात टाळता यावे म्हणून ऑटो चालकांसाठी रास्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून स्थानिक जुना कॉटन मार्केट येथील नेत्र कमलांजली हॉस्पिटल येथे भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटल चे संचालक व नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉक्टर चंद्रकांत पानपालिया ह्यांचे पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते.


।। एक महिना चालणार नेत्र चिकित्सा शिबिर।।

ऑटो चालकांसाठी आयोजित नेत्र चिकित्सा शिबिर हे दिनांक 15।2।21 पर्यंत सुरूच राहणार असून, दररोज जवळपास 50 ऑटोचालकांची नेत्र तपासणी करून त्यांचेवर उपचार करण्यात येणार आहेत तसेच त्यांचे आवडीप्रमाणे गरज वाटल्यास सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत।

आज दिनांक 22।1।21 पासून सदर शिबिराची सुरवात झाली असून उदघटना च्या कार्यक्रमास शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ, नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर पानपालिया, सचिव डॉक्टर श्याम पानपालिया, सहसचिव सुरेश रंधाड, डॉक्टर आशिष पानपालिया हे प्रामुख्याने हजर होते

त्या वेळी वाहन चालविताना नेत्र दोष असल्यास होणाऱ्या धोक्या बाबत वक्त्यांनी अवगत करून एका चालकां साठी नेत्र दोष विरहित डोळे किती आवश्यक आहे हे समजावून सांगण्यात आले, सदर शिबिराचे पहिल्याच दिवशी 45 ऑटो चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली ,सदर शिबिर 15।2।21 पर्यंत 11 ते 5 ह्या वेळेत सुरूच राहणार असून जास्तीत जास्त ऑटो चालकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी ऑटो चालकांना केले आहे।

सदर नेत्र चिकित्सा शिबिर पोलीस अधीक्षक जी श्रीधर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी नेत्र कमलांजली चॅरिटेबल हॉस्पिटल ह्यांचे सहकार्याने आयोजित केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here