नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास…सीओ योगेश कुंभेजकर

रामटेक विभागातील शिक्षकांची कार्यशाळा.

रामटेक – राजू कापसे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण भागातील शाळा व शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य शिक्षक करीत आहे. त्या शिक्षकांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने झटले पाहिजे.अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून काळानुरूप बदल स्वीकारणारे शिक्षकांचे व त्यांच्या कार्याचे,उपक्रमांचे अभिनंदन ही केले.

ग्रामीण भागात आजही अनेकानेक शिक्षक उत्कृष्ट काम करीत आहेत.नाविन्यपूर्ण उपक्रमातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. असे प्रतिपादन नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.ही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रवी नगर नागपूर व पंचायत समिती रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने तिन्ही तालुक्यातील प्रतिनिधिक स्वरुपात मीना श्यामकुंवर,गणेश बेलखुडे, खुशाल कापसे,

ओंकार पाटील,मच्छिंद्र कांबळे, आनंद नंदनवार या सहा शिक्षकांनी पीपीटी द्वारे उपक्रमाचे सादरीकरण केले. सदर कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या सौजन्याने युट्युब द्वारे लाईव्ह प्रसारीत करण्यात आली होती. या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते वेध प्रतिष्ठान नागपूर यांच्या ‘अक्षर वेध’ पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यशाळेला नागपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, राज्य विज्ञान संस्था नागपूर चे संचालक रवींद्र रमतकार,रामटेकचे गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर च्या प्राचार्या मा हर्षलता बुराडे ,रामटेकचे गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने,पारशिवणीचे गटशिक्षणाधिकारी मा कैलास लोखंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाला तिन्ही तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व उत्तम काम करणारे मुख्याध्यापक,विषय शिक्षक, शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या हर्षलता बुराडे यांनी केले.सूत्रसंचालन केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने यांनी केले.

रामनाथ धुर्वे ,विनोद शेंडे,धीरज राऊत, तेजराम येनस्कर,महाराष्ट्र राज्य पुरस्कृत शिक्षक सचिन चव्हाण,सुधाकर कुमरे तसेच सर्व केंद्रप्रमुख तथा गटसाधन केंद्र रामटेक येथील सर्व कर्मचारी व डायट विशेष सहाय्यक यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here