सिंचनाचे पाणी शेतकाऱ्याना मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ प्रकल्प पूर्ण करा- आमदार बळवंत वानखडे…

दर्यापूर – किरण होले

दर्यापूर तालुका हा खारपान पट्याचा भाग असल्याने येथील पावसाच्या पाण्यावर शेतकाऱ्याना अवलंबून राहावे लागते त्यामुळे शेतकाऱ्याना जास्तीत जास्त पीक घेता यावे त्यादृष्टीने तालुक्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण होऊन शेतकाऱ्याना सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आज दिनांक 2 एप्रिल रोजी आमदार बळवंत वानखडे यांनी

दर्यापूर तालुक्यातील सिंचन विभागाचा प्रकल्पावर जाऊन आढावा घेतला. दर्यापूर तालुक्यातील सामदा लघु प्रकल्प , वाघाडी बॅरेज , चंद्रभागा बॅरेज या प्रकल्पाना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन प्रलंबित विषयांचा आढावा घेतला. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे शेती वहिवाट रस्ते मोठ्या प्रमाणात बाधीत झाले असून पावसाळ्या पूर्वी

तात्काळ वहिवाट रस्ते पूर्ण करण्याचे आदेश आमदार महोदयांनी दिले. तसेच सामदा प्रकल्पाचे अंतर्गत प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने अडवण्याचे निर्देश दिले. वाघाडी बॅरेज अंतर्गत यंदा पाणी अडवण्याबाबत सूचना केल्या तसेच तेथील प्रकपांतर्गत बाधित शेतीवहिवाट रस्ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. चंद्रभागा बॅरेजचे काम पूर्ण झाले

असून सांगवा गावालागतच्या शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. चंद्रभागा बॅरेज अंतर्गत उर्वरित असलेले भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. तसेच प्रकल्पाअंतर्गत विविध समस्यांचा आढावा घेतला. यावेळी

अमरावती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री राशनकर साहेब , उपविभागीय अभियंता श्री गिरी साहेब , कनिष्ठ अभियंता श्री गुल्हाने , श्री गोपाळ तराळ उपसरपंच सामदा प्रभाकर तराळ , श्री गजाननराव देवतळे प स सदस्य , श्री गुड्डूभाऊ गावंडे कळाशी, राजुभाऊ कराळे बंडुभाऊ दाभाडे सांगवाआदी मंडळी उपस्थित होती

1 COMMENT

  1. Avatar योगिराज पाटिल वानखडे अध्यक्ष दर्यापूर फोटोग्राफर असोसिएशन

    या वर्षी तरी कळाशी येथील प्रकल्प पूर्ण करा…..
    शहानुर येथे जाण्याकरीता रोड नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here